महेंद्र हिवाळे
चिखली : राज्यभरातील एसटी बसची अवस्था अत्यंत बिकट असुन या बस आता चालवण्या योग्य नसल्या तरी चालक जिवावर उध्दार होऊन कर्तव्य बजावत आहे. अशीच बुलढाणा आगाराची एसटी बस क्रमांक एम एच ०६- ८४०४ ही हातनी च्या घाटावरील वळणावर अचानक ब्रेक फेल होऊन रोड लगतच्या खड्यात उतरली यामधे चालकाच्या प्रसंग अवधान राखत बसवर ताबा मिळवत ७० प्रवाशांचे प्राण वाचवले.सदर घटना दि. २२ जुनच्या दुपारी ३ वाजे दरम्यान घडली.
चिखली येथुन प्रवासी घेऊन निघालेली बस बुलढाणा आगाराची बस हातणी ओलांडून चढ चढत असतांना अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी प्रसंग अवधान राखत गाडी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. बस शेजारी असलेल्या रोडलगतच्या खड्ड्यात उतरली बसचि अपघात झाल्याचे समजताच प्रवाशांमधे भिती पसरली ही बातमी प्रवाशांच्या नातेवाईककांनी त्याठिकाणी गर्दी केली. सुदैवाने या अपघातामधे एकही प्रवासी जखमी झाला नाही.
सटी मधे अर्धतिकीट असल्याने बसमध्ये महिलांची संख्या जास्त होती. एसटी चा प्रवास सुरक्षित मानला जातो त्यामुळे आता प्रवाशांचा ओढा एसटी कडे वाढला असुन यामधे महीला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
चिखली येथून निघालेल्या या बस मधे ८० च्या वर प्रवाशी होते. बस हातणीच्या चढावर असतांना पहिल्या गेअर मधे होती अचानक काही तरी तुटल्याचा आवाज झाला आणि बस पुढे जाण्या ऐवजी मागे येण्यास सुरवात झाली. त्यातच पाठीमागून येणारे दुचाकीस्वार तथा इतर वाहनांना चुकवत चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. बस अचानक बंद पडली आणि बसचे स्टेरींग देखील जाम झाले तरी देखील चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत उतरुन प्रवाशांचे प्राण वाचवले त्यामुळे दिलीप इंगळे या बस चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले.
Users Today : 0