हुसे, सि.राजा प्रतिनिधी –
भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू, नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे भीषण अपघात झाला आहे. यामध्ये २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. एकूण ३३ प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते. बसमध्ये वर्धा, यवतमाळ येथील प्रवासी असल्याचे समजते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दु:खद – २५ जणांचा होरपळून मृत्यू नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री ०१:३० वाजता हा अपघात झाला. बुलडाण्यातील सिंदखेड राजाजवळ बसचे टायर फुटून ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. पुढे ती एका खांबाला जाऊन धडकली.. यानंतर फरपटत एका छोट्या पुलावर जाऊन आदळली. या धडकेत बसच्या डिझेल टँकवर आघात होऊन ते फुटलं. दरम्यान, ठिणग्याही उडाल्याने बसने पेट घेतला.
बस मध्ये अंदाजे 33 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे समृद्धी महामार्गवर आज सकाळी एक ते दोन वाजे दरम्यान सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा परिसरात खाजगी ट्रॅव्हल्स चे टायर फुटल्याने डिव्हायडरला धडक बसून गाडी घासात गेल्याने गाडीने पेट घेतला यात 25 प्रवाशांचा मृत्यू तर आठ प्रवासी थोडक्यात बचावले आहे गाडीचे ड्रायव्हर व कंडक्टर गाडीतून काच फोडून बाहेर आल्याने ते वाचले तर घटनास्थळावर समृद्धी महामार्गचे पोलीस तात्काळ हजर होऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी तुमोड साहेब डी आय जी जयंत नाईकनवरे पोलीस अधीक्षक सुनील कडासने तहसीलदार यांनी घटनास्थळावर भेट दिली
Users Today : 4