
मुंडगाव येथे वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू;
प्रतिनिधी विशाल गवई
मुंडगाव:अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या ग्राम मुंडगाव येथे एका ७६ वर्षिय वृद्धाचा सर्पदंशाने सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंडगाव येथील अन्नपूर्णा नगर येथे दाढी कटिंग चा व्यवसाय करणारे अवधूतराव गणपतराव भातकर वय ७६ वर्ष यांचा ३ जुलै सोमवारला संध्याकाळी सहा ते सात वाजताच्या दरम्यान सर्पदंश झाला त्यांना उपचारासाठी अकोट येथे आणले असता ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलं सुना नातवंड मोठा आप्तपरिवार आहे. मुंडगाव येथे सलग दोन दिवसात दोन वृद्धांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी वृत्तांकनापर्यंत अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती तर ह्या घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुत्र दिनेश भातकर, गोपाल अंबळकार ,अनिल माहोरे यांनी अकोट ग्रामीण रुग्णालय येथे आणले यावेळी मुंडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तुषार पाचकोर पादुका संस्थानचे अध्यक्ष विलास बहादुरे पत्रकार कमलेश राठी, जुगल चिंचोलकार, नंदा भारसाकळे व मोहन काळे यांच्यासह गावातील तरुणांनी व इतरांनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली होती.
Users Today : 11