प्रविण चव्हाण नंदुरबार -: प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरावर पती-पत्नी दर्शनाला आले होते. सायंकाळी पत्नी मैत्रीण कडून आधार कार्ड घेऊन येते असे सांगून गेली पण परत आलीच नाही. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार,प्रकाशा येथे सागर चतुर निकुभ वय वर्ष( 23) रा. बोरद जिल्हा. नंदुरबार हे, आपली पत्नी भाग्यश्री सागर निकुभ वय वर्ष (20 )रा. बोरद यांच्यासोबत नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास देवदर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी भाग्यश्री ही नवऱ्याला सांगून गेली की मैत्रीणे कडून आधार कार्ड घेऊन येते असे सांगून गेली पण परत आलीच नाही. म्हणून तिचा शोध सर्व परिसर, शहादा शहर, नातेवाईक ठिकाणी घेतला असता आढळून आले नाही. अशी तक्रार त्यांचे पती सागर निकुंभे यांनी शहादा पोलीस स्टेशनला दिली आहे. पुढील तपास प्रकाशा पोलीस क्षेत्राचे रामा वळवी हे करीत आहे.
Users Today : 24