प्रतिनिधी विशाल गवई महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत करणे. व गावातील तंटा गावातच मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन 2007 पासून सुरू केली आहे. मात्र या अभी यांनाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी गावागावात आता तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय मुंडगावात येत असून यावर्षी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे पार पडली आहे. यामध्ये अकरा उमेदवारांचे अर्ज व गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जापैकी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. व त्यामध्ये नऊ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने. राजेश वारकरी व सरदार भाई हे उमेदवार निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आले. मतदानाद्वारे पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय कमेटी बनवण्यात आली होती.व तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राजेश गजानन वारकरी यांना 339 मते मिळाली तर शे. सरदार भाई यांना302 मते मिळाली यामध्ये राजेश वारकरी यांनी37 मतांनी विजय मिळवला व यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी तगडा बंदोबस्त लावला होता
Users Today : 59