बुलढाणा :
बदलती जीवनशैली, ताणतणाव, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १७ मे रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक उच्च रक्तदाब दिना’ निमित्त आरोग्य विभागाने नागरिकांना नियमित रक्तदाब तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते, कारण सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत; मात्र हृदयविकार, मेंदूतील
रक्तस्त्राव, किडनी निकामी होणे यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
तज्ज्ञांच्या मते, दररोज जास्त मीठ सेवन, झोपेचा अभाव, धूम्रपान, मद्यपान आणि सततचा मानसिक ताण ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. भारतीयांचे मीठ सेवन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षा दुप्पट असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नियमित चालणे, संतुलित आहार, योग-व्यायाम आणि वर्षातून किमान दोनदा रक्तदाब तपासणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
Users Today : 29