जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारातील मेहंदी व ब्युटी पार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या १०० महिलांना प्रमाणपत्र व भेटवस्तु तसेच मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटप करण्यात आले
महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत मेहंदी व ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्ग समेळपाडा येथे सुरू करण्यात आला होता.
महिनाभर महिलांना मोफत मेहंदी व ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण घेतलेल्या महिलांसाठी मेंहदी स्पर्धा व ब्युटी पार्लर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मेहंदी स्पर्धेत – प्रथम क्रमांक श्रुती माने, व्दितीय क्रमांक कविता धनगर, तृतीय क्रमांक पल्लवी शिंगारे यांनी क्रमांक पटकाविले
ब्युटी पार्लर स्पर्धेत – प्रथम क्रमांक मिस्बा शेख, व्दितीय क्रमांक अर्चना तामखेडे तृतीय क्रमांक तनया मासावकर यांनी स्पर्धेतील क्रमांक पटकाविले सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना जागल्या वृत्तपत्र संपादीका सुजाता लोलयेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सॅनेटरी नॅपकिन वाटप करण्यात आले.
महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.
आजकालच्या धावत्या युगामध्ये स्रिया प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होते.
यावेळी जोगेश्वरीतील सॅनेटरी नॅपकीन कंपनीचे मालक अफझल शेख यांनी सर्व महिलांना मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटप केले.
महिलांच्या चेहर्यावरील आनंद पाहुन मला हि मनस्वी आनंद झाला असे शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी सांगितले. यावेळी जागल्या वृत्तपत्र संपादिका सुजाता जाधव, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, सॅनेटरी नॅपकीन कंपनीचे अफझल शेख, जिजाऊ तालुकाध्यक्ष हर्षालीताई खानविलकर शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, उन्नती कोटक फांउडेशन चा रक्षता जाधव, रूचिता माने, ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी, मेहंदी प्रशिक्षक हार्दी बुदीयाल उपस्थित होते.