मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ डोणगाव येथे साखळी उपोषणास बसण्याची परवानगी द्यावी*… भैय्यासाहेब पाटील यांचे मेहकर तहसीलदारांना निवेदन…

Khozmaster
1 Min Read

खोजमास्टर/साधना भालेराव.डोणगाव:-जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटलांनी सहका-यांसह उपोषण सुरु केले आहे मात्र महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत अमानुष लाठीचार्ज केला हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतांनाच जरांगे पाटलांकडे महाराष्ट्र शासनाने माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले परंतु राज्य शासनाशी समन्वय न झाल्याने जरांगे पाटलांसह सहका-यांचे उपोषण सुरुच आहे सदर उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टीचे बुलढाणा जिल्हा समन्वयक भैय्यासाहेब पाटील डोणगाव येथे साखळी उपोषण करणार असून त्यासाठी त्यांनी मेहकर तहसीलदारांना रविवार दिनांक १० सप्टेंबर पासुन उपोषणास बसण्यास परवानगी मिळणेकरिता निवेदन दिले असून निवेदनात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणींसह विविध प्रकारच्या २४ मागण्यांसाठी साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे व ते १० सप्टेंबर पासुन डोणगाव येथील भारत राष्ट्र समिती पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असून निवेदनावर भैय्यासाहेब पाटलांसह अजय इंगळे रामराव शिंदे पुरुषोत्तम इंगळे राजेंद्र लहाने रमेश गायकवाड बळीराम राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत भैय्यासाहेब पाटलांच्या या साखळी उपोषणाची शासन किती दखल घेते हे मात्र येणारा काळच ठरवणार आहे…….

0 9 3 7 1 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *