जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विलंब; प्रशासकीय दिरंगाईने पाण्याची ३० टक्के हानी

Khozmaster
2 Min Read

जायकवाडी धरणात ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहे.प्रशासकीय दिरंगाईत उर्ध्व भागातील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास उशीर झाला आहे. ऑक्टोबर अखेरीस पाणी सोडणार असल्यामुळे पाण्याची ३० टक्के हानी होईल, असे जलतज्ज्ञांनी म्हटले आहे. नदीपात्र कोरडे पडले असून वाढत्या उष्णतेमुळे पाणी पात्रात झिरपणार आहेमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणातील तरतूद व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यावर्षीच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. समन्यायी पाणी वाटप नियमानुसार १५ ऑक्टोबरपासून नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडणे अपेक्षित होते. ही प्रक्रिया झाली नसल्यामुळे जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांचा प्रश्न अधांतरी आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन तीन जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आणि आवश्यकता यांचा ताळमेळ साधून वरील धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची यंत्रणा त्रयस्थ संस्था म्हणून पाणी वाटपाचे समान नियोजन करणार आहे. नाशिक व नगर जिल्ह्यातील बहुतांश धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. त्यामुळे तातडीने पाणी सोडण्याची मागणी आहे. जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय मागील पंधरा दिवसात होण्याची गरज होती. नदीचे पात्र ओले असल्यामुळे सोडलेल्या पाण्याची जास्त हानी झाली नसती. आता वाढत्या उष्णतेमुळे पात्र कोरडे पडत असून बाष्पीभवन वाढणार आहे. त्यामुळे सोडलेले पाणी आणि प्रत्यक्षात पोहचलेले पाणी यातील तफावत मोठी असेल याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *