पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा शिर्डीला येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या मोदींच्या या दौऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबरला मोदी शिर्डीत विविध कार्यक्रमांसाठी येणार आहेत. नियोजनासाठी सध्या सरकारी आणि पक्षाच्याही बैठका सुरू आहेत. गर्दी जमवण्यास मदत व्हावी, यासाठी या दिवशी शाळांना सुट्टी देण्याचीही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ३० ते ३५ हजार लाभार्थी आणि लाखांची गर्दी जमविण्याचे नियोजन सुरू आहे.साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा २६ ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे ३० ते ३५ हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी पंतप्रधान मोदी शिर्डीला आले होते. त्यानंतर आता पुन्हा २६ ऑक्टोबरला त्यांचा नियोजित दौरा आहे. त्यांच्या हस्ते निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पण, शिर्डी विमानतळाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन, साई संस्थानच्या शाळेचे उद्घाटन, महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन, साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेचे उद्घाटन यासह राज्यातील काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन होणार आहे. सोबतच केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही होणार आहे. यासाठी किमान एक ते दीड लाख लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन आहे. सुमारे ३० ते ३५ हजार लाभार्थ्यांनाही शिर्डीत आणले जाणार आहे.