भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धारतीर्थावरील कोरोना काळ 2019 ला पुरातन विभाग नागपूर यांनी टाकलेली बंदी आजही कायम ठेवल्याने भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे
महाराष्ट्र शासन भारत सरकार यांच्याकडून कोरोना काळात आलेल्या आदेशावरून भारत भराने त्या आदेशाची जोपासना प्रत्येक वेळी करून दोन वर्षापर्यंत सर्वांनीच आप आपल्या परीने सहकार्य केले त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रसह भारतातील लावलेल्या सर्व बंदी उठविण्यात आल्या परंतु पुरातन विभाग नागपूर यांनी मात्र एकमेव लोणार धार तीर्थावर बंदी कायम ठेवून भाविक भक्तांच्या भावनेला ठेच पोहोचवीली टाकलेली बंदी का धारतीर्थ बंदीमुळे पुरातत्त्व विभाग यांना त्या बंदीपासून काय फायदा होत आहे हेच कळायला मार्ग दिसत नाही धार तीर्थाचे पाणी सरोवर मध्ये जाते आणि नुकसान होते हे कारण जर पुरातत्त्व विभागाचे असेल तर धार तीर्थाचे पाणी इंग्रज काळापासून तर भारत स्वतंत्र झाल्यापासून धार तीर्थ चे पाणी हे सरोवरामध्ये जात होते व आजही पाणी सरोरामध्येच जाते त्यावेळेस कोणतेही नुकसान झाले नाही मग ही बंदी कशासाठी हा प्रश्न भाविक भक्तांना भेडसावत असल्याने व त्याबाबत पुरातत्व विभागाने त्याबाबत खुलासा सुद्धा केलेला नाही महाराष्ट्र शासनाचे संचालक डॉक्टर तेजस म गर्गे यांनी पुरातन विभाग नागपूर यांना पत्र दिल्यानंतर सुद्धा त्या पत्राची दखल सुद्धा घेतली नाही श्रावण मास मध्ये बंदी शितल करून परत श्रावण संपल्यावर धारतीर्थावर बंदी टाकली त्याचे कारणा कळण्यास मार्ग नाही पुरातन विभागाने ह्या टाकलेल्या बंदीला कायमस्वरूपी हटवण्यासाठी मुंबई ला जाऊन धरणे व त्यानंतर लगेच आमरण उपोषणा निवेदन पर्यटन मंत्री सह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व संबंधित अधिकारी यांना निवेदना च्या प्रति दिल्या आहेत. धरणे मुंबई ला दि.21-11-2023 ला आमरण उपोषण आझाद मैदानावर दि.22-11-2023 पासून सुन्दर निर्मल संचेती, देवांग संदीप संचेती आणि आशुतोष दादाराव मोरे हे करणार आहे.