पहूर येथे सुगंधित गुटखा प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकासह काॅन्स्टेबल निलंबित

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव जिल्ह्यातील पहूर पोलिस स्टेशन हद्दीत सुंगधीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पहूर पोलिस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांना बुधवार, १८ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले.याबाबत अधिक असे की, पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवार १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यात वरील दोघांनाही निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात येऊन पुढील तपास करीत  आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *