मुंबई दि (प्रतिनिधी) पवईतील हॉटेल टूरिस्ट मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी पालिकेच्या एस विभाग सहाय्यक पालिका आयुक्तांकडे करण्यात केली आहे. त्यामुळे हॉटेल मालकांकडून जीवितास धोका असल्याची तक्रार डॉ. राजन माकणीकर यांनी मुख्यमंत्री व मुंबई पोलीस कमिशनर यांना केली आहे.
विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी केलेल्या तक्रारी पत्रात असे म्हटले आहे की, विहार लेक गेट पवई या ठिकाणी असलेल्या या हॉटेलमध्ये एकूण, ४३ खोल्या असून, त्यातील १४ खोल्या या अनाधिकृत आहेत. येथे एक स्टुडिओ उभारण्यात आला असून, तोही अनधिकृत आहे.
अश्या आशयाच्या मी संबंधितना तक्रारी दिल्या असून या हॉटेल मालकाचे चमचे व पालतू किंवा भाड्याच्या गुंडामार्फत मालक के अशोक राय मला जीवित हानी करण्याची शक्यता असल्याची संभावना डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.
हॉटेल मालकांनी सदर प्रकरणात मांडवली केली असून पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यात हाथ धुवून घेतले आहेत. यामुळे याप्रकरणाची चौकशी करणे गरजेचे आहे. आता मांडवली केलेले अधिकारी व आधी बांधकाम करू देणाऱ्या कर्तव्यात कसूर अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबणं व्हावे अशीही आग्रही मागणी डॉ. माकणीकर यांनी केली आहे.
सदर प्रकरणात स्थानिक पालिका प्रशासन काहि राजकीय मंडळी तर पोलीस प्रशासन हि पूर्णतः मॅनेज असल्यामूळे माझ्या व परिवाराच्या जीविताला धोका संभावू शकतो अस हि म्हटले आहे.
या हॉटेल मध्ये 1 तास 2 तास अश्या पद्धतीने रूम देण्यात येतात… यामध्ये नविन जोडपं आपली शारीरिक भूक भागविण्यास येतात… बाजूलाच आदिवासी पाडा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या महिला हॉटेल समोरून लाजेने मान खाली घालून जातात. हे फार लज्जास्पद आहे.
या हॉटेलमध्ये किती वर्षाचे कपल सहवास साधतात याचा तपास करावा आधीच्या सर्व नोंदी तपासाव्यात. असेही माकणीकर म्हणाले.
अनधिकृत असलेले हॉटेल चे बांधकाम पाडावे, अनधिकृत स्टुडिओ ताब्यात घ्यावा व पोलीस संरक्षण मिळवून द्यावे.
तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी पूर्ण मॅनेज असून अन्य कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यां च्या मार्फतीने पुढील तपास करावा.
असेही विनंती माकणीकर यांनी केली आहे.
लवकरात लवकर कारवाई नाही झाल्यास मा. राज्यपाल कार्यल्यासमोर आमरण उपोषन करनार असल्याचे डॉ. माकणीकर यांणी पत्रकारांशी बोलताना सांगितले.