रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान बचाव यात्रेचा प्रारंभ नागपूर दीक्षाभूमीवरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या नेतृत्वात 24/ 10/ 2023 ऑक्टोबर रोजी नागपूर दीक्षाभूमी येथून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान बचाव यात्रा पोहोचणार आहे या संविधान बचाव यात्रेमध्ये स्वतः सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहे त्यानिमित्त दि. 4/ 11/ 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्यात संविधान यात्राही चिखली तालुक्यात येणार आहे तरी तमाम जनतेने संविधान यात्रेमध्ये उपस्थित रहावे. असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी चिखली विश्रामगृह येथे सर्व पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. सदर कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साही दिसून आले व सर्वांनी विजयकांत गवई यांना कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने उपस्थितीमध्ये ब्रह्माभाऊ साळवे, सलीमभाई, सुरेशभाऊ इंगळे, मुख्तारभाई, श्याम लहाने, सुनील सोळंके, रमेश अंभोरे, सतीश पवार, सोहेल सौदागर, ऋषिकेश हिवाळे, दीपक तायडे, प्रवीण नरवाडे, यश बावस्कर, राम बावस्कर, पवन साळवे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 39