दलिप ताहिल यांना खावी लागणार तुरुंगाची हवा; २०१८ मधील ते प्रकरण आलं अंगाशी

Khozmaster
2 Min Read

अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलिप ताहिल आता एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ६५ वर्षीय अभिनेत्याला दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लेटेस्ट रिपोर्टनुसार, दलिप ताहिल यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. २०१८ साली झालेल्या एका प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आले. खारमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल आणि कारने एका ऑटोरिक्शाला धडक देऊन त्यातील प्रवासी महिलेला जखमी केल्याबद्दल त्यांना दोषी ETimes मधील वृत्तानुसार, न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून रिक्षाला धडक दिल्याबद्दल दलिप यांना दोषी ठरवले. डॉक्टरांनी दिलेल्या साक्षीनंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. डॉक्टरांनी दारुच्या वासाची पुष्टी केली आणि त्यावेळी ते धडपडत चालत होते असेही सांगण्यात आले. शिवाय काहीतरी चुकीचे बडबडत असल्याचे समोर आले आहे, दरम्यान याबाबत अद्याप दलिप यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. डॉक्टरांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात ताहिल यांना दोषी ठरवून दोन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.ठरवण्यात आले. या अपघातामध्ये जखमी झालेल्या महिलेने तक्रार केली होती.मीडिया रिपोर्टनुसार, २०१८ साली जेव्हा हे प्रकरण घडले तेव्हा अटक झालेल्या दलिप यांनी तपासणीसाठी रक्त देण्यासही नकार दिला होता. दलिप यांची कार एका ऑटोरिक्षाला धडकून दोन प्रवासी जखमी झाले होते. दलिप यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीत ते अडकले. त्यामुळे ते रिक्षातील प्रवासी दलिप यांच्या गाडीपर्यंत पोहोचले आणि त्यांच्यात त्याठिकाणी खडाजंगी जाली. असाही आरोप करण्यात आला की, त्या बाचाबाचीदरम्यान दलिप यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. त्यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर दलिप यांना अटक झाली होती.त्या रिक्षामध्ये असणाऱ्या प्रवाशांची नावं जेनिता गांधी (२१) आणि गौरव चुग (२२) अशी होती. ‘टक्कर झाल्यामुळे गांधी त्यांच्या पाठीला आणि मानेला जबर झटका बसला होता. गांधी आणि चुग ऑटोरिक्षातून उतरले तेव्हा त्यांना गाडीचालक सांताक्रूझच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमुळे रस्त्यावर गर्दी असल्याने त्याची गाडी पुढे जाऊ शकली नाही’, अशी माहिती खारच्या पोलीस अधिकाऱ्यांने द हिंदूशी बोलताना दिली. दरम्यान दलिप यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *