“नवरात्री दुर्गा उत्सव विशेष”
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहदुर ; दी.२२ ,नवरात्री नवदुर्गा उत्सवाला रविवारपासून झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये नारी शक्तीचे नवरंग हे आपल्याला उत्सवामध्ये बघायला मिळतात. अनेक ठिकाणी नवदुर्गेची स्थापना करून वेगवेगळे उपक्रम सामाजिक उपक्रम आणि सर्वात उत्साहाचा म्हटलं तर गरबा हा आहे. यामध्ये अनेक वेगवेगळ्या भागातील महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी आपले नवरंग सादर करतात तर समाजामध्ये आपल्या संसाराचा गाडा हाकत समाजाची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शासकीय निमशासकीय प्रशासन विभागातील महिला ह्या आपल्या कार्यकर्तुत्वाची जबाबदारी सांभाळत असतात. यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे एक महिला शिक्षिका होय..! श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथील महिला शिक्षिका आपली कार्यकर्तव्य जबाबदारी सांभाळून (BSW ) बी.एस.डब्ल्यू (MSW )एम.एस.डब्ल्यू या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना धडे देण्याचे काम आपल्या सेवेतून करत आहेत. म्हणजेच भावी जीवनातील एक समाजातील महत्त्वाचा घटक समाजाचे डॉक्टर म्हणून ज्यांना संभोदित केले जाते ते समाजकार्याचे विद्यार्थी हे घडत असतात. की जे समाजामध्ये आपली सेवा देण्याची काम हे विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये आपल्या समाजातील समस्या निवारण करण्याचे शिक्षण घेऊन सर्व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ,आणि आरोग्य, सांस्कृतिक भूमिका निभवल्याचे काम हे करीत असतात. यामागील मुख्य भूमिका म्हणजे शिक्षक शिक्षिका नारीशक्ति होय अशा ह्या समाजकार्य अभ्यासक्रमातील धडे देणाऱ्या नवदुर्गा. प्रा.डॉ भरती देशमुख , प्रा.डॉ.जयश्री देशमुख ,प्रा. दिपाली देशमुख, प्रा.मनिषा कीर्तने, प्रा.डॉ.जयश्री काळे
शब्दांकन : आकांक्षा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते तथा
BSW – २ समाजकार्य विद्यार्थिनी –
श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिम