चिखली मन्सूर शहा दै.मुस्लिम शहा फकीर जातीचा समावेश भटक्या-मुक्तपरवर्गामध्ये करण्यात यावा अशी मागणी मुस्लिम शाप की समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्याकडे २० ऑक्टोबर रोजी निवेदनाद्वारे करण्यात आले असून. या निवेदनात असे नमूद आहे की संघटनेच्या वतीने मुस्लिम शहा, फकीर या जातीचा भटक्या विमुक्त प्रवर्गात समावेश करावा म्हणून सन २०१९ पासून राज्य शासनाकडे वेळोवेळी आंदोलन करून व निवेदन देऊनही समाजाला न्याय मिळाला नाही. शासनाने शहा फकीर मुस्लिम तसेच दरवेद अशा वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय व परिपत्रक काढून या समाजाला शैक्षणिक आर्थिक सामाजिक सवलती देण्याचे काम केले आहे. एका जाती संदर्भात वेगवेगळे शासन निर्णय असून. यासंदर्भात जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची दिशाभूल होत आहे .त्यामुळे अधिकारी तो निर्णय घेत नाहीत मुस्लिम शहा फकीर जातीचा आज रोजी इतर मागास प्रवर्गामध्ये १ जानेवारी २००१ च्या शासन निर्णयाप्रमाणे मुस्लिम फकीर या जातीचा अनुक्रमांक ३३५ वर आहे ही या यादीतून सदर जात वगळून भटक्या विमुक्त प्रवर्ग प्रवर्गात समावेश करावा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे -१ अहवाल ४९ माहे ऑक्टोबर २०१४ या अहवालात आयोगाने यादीतील अनुक्रमांक २३ यादीतील क्रमांक ३७ वर दरवेशी वाघ वाले शहा मुस्लिम धर्मिया यांचा व्यवसाय भिक मागणी आहे .असे नमूद केले आहे तसेच १ जानेवारी २००१ च्या शासन निर्णयामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये मुस्लिम फकीर या जातीचा समावेश ओबीसी मध्ये आज रोजी आहे. सदरची जात ही भटकी जमात म्हणून आजही राज्यात ओळखली जात आहे. त्यामुळे इतर मागास प्रवर्गात समावेश असलेली मुस्लिम शहा फकीर की जात वगळून भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी मान्य न केल्यास २१ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येईल .असा इशारा या निवेदनात दिला आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष के.जी शहा, लूकमान शहा सह जिल्हाध्यक्ष, तहेसीन शहा, अकील शहा, शाहिद शहा ,उस्मानच्या बुढनशहा, जुबेर शहा, सादिक शहा, हसन शहा ,इरफान शहा, सोहेल शहा रजा शहा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 39