प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधि) हिंदुस्तान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवा निमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा दौडचे
बालवीर चौकात शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महिला सुवासिनींनी भगवा ध्वज आणि मशालधारी धारकरीं बालिका व युवतींचे औक्षण करीत कुंकूम तिलक केले.
हिंदुस्तान प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवानिमित्त दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते.यंदा बुधवारी चौथ्या माळे दिवशी पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गा दौंडला प्रारंभ झाला.अग्रभागी मशाल व भगवा ध्वज हातात घेऊन फेटे परिधान केलेल्या बालिकांनीी लक्ष वेधून घेतले. त्यांच्यासोबत पांढरे वस्त्र, पांढरी टोपी, भगवा ध्वज हातात घेऊन जय श्रीराम… जय मातादी… वंदे मातरमच्या घोषणा देत धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दुर्गा दौड छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोठा मारुती मंदिर,कुंभारवाडा, गवळीवाडा, नवनाथ नगर, नवा भोईवाडा मार्गे बालवीर चौकात पोहचले.या ठिकाणी मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढण्यात आली.देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला.मंडळातर्फे पुष्पवृष्टी करीत दुर्गा दौडचे अनोखे स्वागत करण्यात आले.बालवीर चौक परिसरातील महिला सुवासिनींनी औक्षण करीत स्वागत केले.स्वागत संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे,ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, गोपाल गवळी, आदींनी केले. त्यानंतर दुर्गा दौड बालवीर चौकातून नवा भोई वाडा, चव्हाण चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, साक्री नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भाट गली, शिवाजी चौक, गणपती मंदिर रोड, माणिक चौक, नगर पालिका मार्गै, दीनदयाल चौकातून खोडाई माता मंदिरावर दुर्गा दौड पोहोचली.खोडियार माता मंदिरात आरती नंतर दुर्गा दौडचा समारोप करण्यात आला.
फोटो कॅप्शन- नंदुरबार येथील बालवीर चौकात दुर्गा दौडचे शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीने स्वागत व औक्षण करण्यात आले.