छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व बनोटी परिसरातील शेतकऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही शासनाकडून अनुदान तत्वावर देण्यात येणाऱ्या बियाणांमध्ये काही गैर नसु नये याकरिता सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. 10 वर्षाखालील हरभऱ्याच्या बियाणाला अनुदान दिले जाणार आहे . तर हेच अनुदान नव्या वाणाच्या बियाणांना देण्यात येणार आहे. कारण काळाच्या ओघात बियाणांमध्ये खराबी झाल्यास उगवण क्षमतांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे रब्बीसाठी शेतकऱ्यांना नवे बियाणे मिळणार असल्याची माहिती कृषी सहायक विजयसिंह निकुंभ, कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियनांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणांचे वाटप केले जाते. आता रब्बी हंगामाला सुरवात होत आहे. तर नव्याने तयार करण्यात आलेले बियाणेच ते ही त्याच अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासंबंधीच्या सुचना शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांच्या कडून देण्यात आल्या आहेत.
नव्या निर्णयाचा काय होणार फायदा हरभरा हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची लागवड दुप्पट होणार असल्याचा अंदाज आहे.
अनुदानित बियाणांचे वाटपला सुरुवात झाली आहे. शिवाय वेळेत बियाणे हे शेतकऱ्यांना मिळेल याबाबत कृषी अधिकारी यांना सुचना करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये जर शेतकऱ्यांचे नाव आले तर बियाणे खरेदीचा परवाना हा तालुका कृषी कार्यालयातून घ्यावा लागणार आहे. परवान्यावर नोंद असलेल्या दुकानी जाऊन अनुदानाची रक्कम वगळून शेतकऱ्याला हरभऱ्याचे बियाणे हे मिळणार आहे. मात्र, बियाणे घेताना शेतकऱ्याकडे सातबारा, 8 अ, आधार कार्ड असणे गरजेचे आहेमदन सिसोदिया तालुका कृषी अधिकारी सोयगाव
*अनुदानावर हरभरा बियाणे उपलब्ध*“””हरभरा प्रमाणित बियाणे (10 वर्षाच्या आतील) 85 रुपये प्रति किलो दर अनुदान 25 रुपये उर्वरित लोकवाटा 60 रु प्रति की.लो तसेच 10 वर्षाच्या वरील 77/78/75 प्रति की.लो. दर अनुदान 15 रुपये उर्वरित लोकवाटा पॅकिंग साइज – 30kg
उपलब्ध जाती – जॅकी, राजवीजय 202, कांचन, फुले विक्रम असे एकूण 85 क्वीटल बियाणे आले आहे.आवश्यक कागदपत्रे – सातबारा उतारा व आधार कार्ड
बियाणे उपलब्ध ठिकाण – सोयगाव कृषी केंद्र, सोयगाव
कृषी सहाय्यक विजयसिंह निकुंभ मो.९४२३१६२१३०, कृषी पर्यवेक्षक हेमंत देशमुख मो.९४०३६९४८१०,बि टी एम अमोल महाजन, मंडळ कृषी अधिकारी आर जी गुंडिले, तालुक्यातील शेतकऱ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा.
Users Today : 18