सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२३’ अर्ज करण्याच्या तारखेत महत्त्वाचा बदल, आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Khozmaster
2 Min Read

CBSE Single Girl Child Scholarship 2023: CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या पायर्‍यांविषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थिनी आणि पालकांनी मार्गदर्शक तत्त्वे वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.CBSE Single Girl Child Scholarship 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. त्यामुळे, ज्या विद्यार्थिनींनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना आता ३१ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. CBSE सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी नोंदणी करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी लागेल. ज्या विद्यार्थिनींना गेल्या वर्षी सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप मिळाली होती आणि या वेळीही ती मिळवायची आहे त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत नूतनीकरणासाठी अर्ज करावा लागेल. मात्र, नियमांनुसार इयत्ता अकरावीच्या परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणारेच अर्ज करू शकणार आहेत.

सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी असा करा अर्ज :

पायरी १ : अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
पायरी २ : त्यानंतर, मुख्य वेबसाइट लिंकवर टॅप करा.
पायरी ३ : सार्वजनिक सूचनेच्या पुढे अर्ज करण्यासाठी येथे टॅप करा.
पायरी ४ : तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित केले जाईल.
पायरी ५ : अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि अर्ज भरा.
पायरी ६ : आता, कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
पायरी ७ : शेवटी, अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

CBSE ने २००६ मध्ये सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप प्रोग्राम (Single Girl Child Scholarship Program) सुरू केला होता. या अंतर्गत २ वर्षांसाठी दरमहा ५०० रुपये दिले जातात. इयत्ता दहावी शाळेची फी १०० रुपयांपेक्षा जास्त नसावी. संपूर्ण वर्षासाठी ते केवळ १५०० रुपये प्रति महिना असावे. या शिष्यवृतीसाथी अर्ज करण्याच्या उमेदवार पात्रतेशी संबंधित अधिक माहिती अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात. अधिकृत वेबसाइटवर तपशील माहिती उपलब्ध करून देण्याता आली आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *