मंदाकिनी भोसले यांचा ‘मराठा आरक्षणाला’जाहीर पाठिंबा

Khozmaster
2 Min Read
सौ. . मराठा आरक्षणावरून विदर्भातील भारतीय जनता पार्टी सदस्यत्वाचा पहिला राजीनामा देणारी मराठा योद्धा. राजकीय कुटीरवाद्यांच्या कोणत्या च प्रलोभन आणि फुटीरवादी वृत्तीला बळी न पडता सकल मराठा समाजाने अखंड महाराष्ट्राच्यामंदाकिनी भोसले यांचा ‘मराठा आरक्षणाला’जाहीर पाठिंबा रक्षणासाठी एकत्र येण्याची ही ऐतिहासिक संधी गमवू नये असे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी युवती मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्ष, सौ मंदाकिनी भोसले यांनी केले. समाजातील राजकीय नेत्यांनी देशमुख, मराठा, कुणबी, अशी आकलेची तार न तोडता गरजवंत मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावे, नसता येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाज आपणास गल्लीत देखील उभे राहण्याच्या लायकीचे ठेवणार नाही हे विसरू नये. व विदर्भातील सर्व मराठ्यांनी आपला ,’मराठा धर्म, न विसरता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी आपणा सर्वांना आवाहन करत आहे. कुणबी ही जात नसून मराठ्यांचे आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी निर्माण केलेला एक संवर्ग आहे . त्यामुळे विदर्भातील मराठा बांधवांनी स्वतःला कुणबी म्हणून न घेता आपण मराठा असल्याचे विसरू नये. आज महाराष्ट्रातील आपली मराठा बांधव तरुण – तरुणी रोजगार मिळवण्यासाठी रानोरान भटकत आहेत, आज त्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. अखंड विदर्भ त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यास या आरक्षणाला वेगळे वळण मिळेल, या भावनेने प्रेरित होऊन मी आजवर भूषवलेल्या भारतीय जनता पार्टी महिला तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महिला जिल्हा सरचिटणीस, तसेच भारतीय जनता पार्टी युती मोर्चा जिल्हा अध्यक्ष जिल्हा बुलढाणा, व सरसकट भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला विदर्भातून जाहीर पाठिंबा देत असल्याचे सौ मंदाकिनी भोसले यांनी पत्रकार बांधवांना सांगितले. शिवरायांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्ष साकार रणाऱ्या 31 शिलेदरांपैकी 12 शिलेदार धनगर समाजातील होते, स्वराज्यासाठी लढणाऱ्या आपल्या धनगर बाधवांचा इतिहास आपणास विसरुन चालणार नाही. आज रोनोरान भटकत आपली उपजीविका करणाऱ्या आपल्या धनगर समाज बांधवांना आरक्षणाची खूप गरज असल्याने आपला धनगर समाजाला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे सौ मंदाकिनी भोसले यांनी मत व्यक्त केले.
0 9 4 7 4 9
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *