जयहिंद लोकचळवळ आता राज्यभर काम करणार..

KHOZ MASTER
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) :- सुदृढ समाजनिर्मितीतून सशक्त देश तयार करण्याचं ध्येय घेऊन गेली २२ वर्षे काम करणाऱ्या जयहिंद लोकचळवळ या संघटनेने आता राज्यभर आपल्या कामाचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.
३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान मुंबई येथे झालेल्या जयहिंद लोकचळवळीच्या चौथ्या ग्लोबल कॉन्फरन्स २०२३ मध्ये याबाबतची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी केली. त्याप्रमाणे आता या संघटनेचे काम संपूर्ण राज्यभर केले जाणार असून जयहिंद लोकचळवळ ही संघटना शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, तंत्रज्ञान, उद्योजकता, कृषी, विकास, लिंग समानता, सामाजिक प्रश्न, समता, सद्भावना, या क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून वाटचाल करत आहे.
ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेल्या चौथ्या जागतिक परिषदेसाठी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातूनही अनेक तरुण- तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
  आता जयहिंद लोकचळवळीचं काम आपल्या जिल्ह्यात वाढवण्याच्या दृष्टीने संघटनेची पहिली जिल्हास्तरीय आढावा बैठक २८ ऑक्टोबर  तारखेला सकाळी १०.०० वा. अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नंदुरबार या ठिकाणी होणार आहे.
आ. सत्यजीत तांबे हे आता जयहिंदच्या कामात विशेष लक्ष देत असून या संघटनेला राज्य पातळीवर घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.
  गेल्या २२ वर्षात संघटनेच्या कामाच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण
राज्यभरात असलेला संपर्क आणि त्या माध्यमातून त्यांना जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांना जयहिंदचं एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हजारो युवक या संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक आहेत.
  संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी २८ ऑक्टोबर  तारखेला सर्व जिल्ह्यांत जिल्हास्तरीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत संघटनेची पुढील रूपरेषा जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी केंद्रीय कार्यालयातून आलेले प्रभारी पार पाडतील. सुदृढ समाजनिर्मितीसह राष्ट्र उभारणीसाठी जयहिंद लोकचळवळीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी अधिक माहितीसाठी  जितेंद्र सुर्यवंशी- ८६५९००५१९९,  संदिप मराठे – ९४२०६०३४४४,  दिग्विजयसिंग राजपूत ८२७५५९०२३०,   जाधव हिमांशू – ७७४४०२१४२३
असे आवाहन श्री. जितेंद्र सुर्यवंशी , श्री. संदिप मराठे यांनी केले आहे.
0 9 7 1 9 5
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *