माता नवदुर्गेची आजची सप्तमी निमित्त सातवी माळ संपन्न.

Khozmaster
2 Min Read

 

माता नवदुर्गेची आजची सप्तमी निमित्त सातवी माळ संपन्न

प्रतिनिधी विशाल गवई

     माता नवदुर्गेची आजची सप्तमी निमित्त सातवी माळ संपन्न.पणज ता आकोट, माता महालक्ष्मी चे माहेर म्हणून सुप्रसिद्ध जागृत तिर्थक्षेत्र. येथील भोईपुय्रात न्यू मित्रमिलन महिला मंडळ व्दारे अनेक वर्षांपासून परंपरागत रीत्या नवदुर्गोत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात दरवर्षी नवनवीन उपक्रम राबविले जातात. यावर्षी सुध्दा महिलांव्दारे महिलांकरीता उपयुक्त महिला मेळावा, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मेळावा,स्त्री शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसन मुक्ती,असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले तसेच यंदा माता रुख्मिणी चे कौडिण्यपुर ची माहेरवाशीनी, पणज ची सासुरवाशीण सौ. हर्षा गीरी ह्यांचे कल्पनेतून सातव्या माळीनिमीत्य प्रत्येकी सात स्त्रियांची एक माळ अशा सात माळा,प्रत्येकी चे सात दिपक असे एकूण एकोणप़न्नास दिपक व मंचावर एक्कावन्न दिपक व घटामधील एक दिपक असे एकुण एकशे एक दिव्यांची आरास मांडुन एकशे एक सुवासिनींनी महाआरती केली. ईतकी लयबद्ध सुंदर मृदंगमंजीय्राच्या तालावर कुमारीकेंनी सहभागी होऊन केलेली महाआरती उपस्थितांचे मन मोहून गेली. मृदंगावर गोपाल नेमाडे यांनी तर मंजीय्रावर अनिल रोकडे, विश्वजित देशमुख, डॉ दर्शन कुमार तायडे, कुणाल सावीकार यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जयाताई रोकडे,सौ.निर्मला नेमाडे,सौ.नंदाताई सावीकार यांनी केले.तसेच यशस्वीतेसाठी भोईराज महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रुख्मिणी तायडे, सदस्या मा. सरपंच सौ.सविता तायडे,सौ.सुमित्रा नेमाडे,सौ.रेखा भारसाकळे,सौ.सविता भारसाकडे,सौ.नर्मदा भारसाकडे, सौ.मनिषा तायडे,सौ.सुशिला सपकाळ,सौ.उषा कारले तसेच सौ. जयाताई देशमुख, सौ.आशा तायडे

सौ. पद्मावती सावीकार सौ. अमृता सावीकार, सौ. ललिता सावीकार सौ. इंदुमती तायडे, सौ. संगीता भारसाकडे यांनी अथक परिश्रम घेतले. व सदर सातव्या माळीचा अलौकिक,अद्भुत असा सोहळा याची देही याची डोळा,नेहमी पहावया मिळो सकळा. अशी नवदुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना करुन ग्रामपंचायत चे ज्येष्ठ सदस्य डॉ.रतनलाल तायडे भोई यांचे उपस्थितीत संपन्न झाला.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *