महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

Khozmaster
2 Min Read

नागपूर: चहा-बिस्किटांसाठी महिलांना भूल देऊन शस्त्रक्रिया सोडून पळ काढण्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. ही महिला डॉक्टर प्रसूतीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते आतिष उमरे यांनी केला. सोमवारी स्थायी समितीत केला. यावर संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी अजय डवले यांना दिले. टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) एक महिला डॉक्टर आहेत. येथे येणाऱ्या महिलांची त्या प्रसूतीच करत नाही. गेल्या काही दिवसात तीन घटना घडल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर त्यांच्याकडून दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर प्रसुती झाली. वेळीच दुसऱ्या डॉक्टराची व्यवस्था झाली नसती तर महिलेचा जीवही धोक्यात आला असता. हा प्रकार गंभीर आहे, असे म्हणत उमरे यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. इतरही सदस्यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे संबंधित डॉक्टराची इतरत्र बदली करून टाकळघाट पीएचसीमध्ये दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला. विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी तीन शाळांवर गुन्हे दाखल झाले असून पाच शाळांवर गुन्हे दाखल झाले नसल्याचे सांगत सीईओंनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करण्याची सूचना केली. अध्यक्ष मुक्ता काकड्डे यांनी उर्वरित शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. बैठकीला सीईओ सौम्या शर्मा, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, राजू कुसुंबे, प्रवीण जोध, व्यंकट कारेमोरे, दिनेश बंग, नाना कंभाले आदी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *