बुलडाणा, दि. 24 (जिमाका): राज्याचे सहकार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पिंपळगाव सराई येथे शहीद अक्षय गवते यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सियाचीनमध्ये कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या अक्षय यांचे कुटूंबिय वडील लक्ष्मणराव, आई अलकाताई व बहिण श्वेता आदींसमवेत पालकमंत्र्यांनी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर होते.
शासन शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी यावेळी दिली.
सरपंच केशव तरमळे यांच्यासह ग्रामस्थ बांधव उपस्थित होते
Users Today : 22