तालुका चिखली,
“खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, निर्णय क्षमता, सहानुभूती ,शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते. आणि या गुणाच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो,”.
हे मोलाचे विचार आदरणीय जितेंद्र भाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केले. वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माननीय जितेंद्र भाऊ बोंद्रे यांनी केले. 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर अश्या पाच दिवसांच्या या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक खेळाचे आयोजन केल्या गेले. अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य आदरणीय बालैया गंगाराबोयना सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडाशिक्षक सौदागर सर आणि पेरे सरांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले.
या विविध खेळांमध्ये राणी लक्ष्मीबाई हाऊस, आर्यभट्ट हाऊस,सुश्रुत हाऊस आणि कल्पना हाऊस मधील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी अशा एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सगळ्या हाऊस चे शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
सन २०२३ते २४ वार्षिक क्रीडा महोत्सवाचे क्रीडा चषक आर्यभट्ट च्या हाऊस ने पटकाविले. तर दुसऱ्या स्थानावर सुशृत हाऊस विजयी झाला. सर्व खेळाडू कौशल्य पणाला लावून खेळत होते. इतर हाऊसच्या खेळाडूंनी चुरशीची लढत दिली. विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूलच्या अध्यक्षा सौ. वृषाली ताई बोंद्रे, शाळेच्या सल्लागार सुजाता कुल्ली व शाळेचे मुख्याध्यापक बालय्या गंगाराबोयना यांनी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला. ‘मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन सौ वृषालीताई बोंद्रे यांनी केले. स्कूलच्या अध्यक्षा वृषालीताई बोंद्रे, माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे आणि जया नन्हई यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. व खेळाचे महत्व पटवून दिले. वार्षिक क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत घेतली आणि राष्ट्रगीताने क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.
Users Today : 18