छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . २५) विद्यार्थ्यांनी चौकस राहून परीक्षेला सामोरे जावे , असे आवाहन आर . बी . आर . विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन यांनी केले .
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली असता दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला . दिवाळी सुट्टी दरम्यान जादा तासिका सुरू असून विद्यार्थी परीक्षा लक्षी अभ्यास करत त्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले . प्रारंभी हरीभाऊ राऊत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . यावेळी बी . एन . जाधव , प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती . वर्ग शिक्षक शंकर भामेरे यांनी सुत्रसंचालन केले .
Users Today : 18