छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव
वैजापूर ता,२५
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोयगाव चे पोलीस पाटील
सूर्यकांत रामदास पाटील मोटे यांच्या वतीने राज्यातील
विविध क्षेत्रात आपल्या कला,कौशल्य,व कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजप्रबोधन ,सामाजिक ,शैक्षणिक, अध्यात्मिक,कृषीविषयक,सांस्कृति क, व पर्यावरण पूरक कार्य ज्यात वृक्षारोपण, स्वच्छता, पाणी वाचवा,प्लास्टिक ला नाही म्हणा,असे उत्कृष्ट कार्य करून सामाजिक ऋण फेडणाऱ्या कर्तृत्व संपन्न व्यक्तींना रविवार(ता,२६)रोजी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, राज्यातील विविध क्षेत्रातील ३१ पुरस्कारर्थी ची वरील निकष लावून निवड करण्यात आलेली आहे,यात बाल कलाकारांचा ही समावेश करण्यात आला आहे,जिजाऊ बहुउदेशीय सेवाभावी संस्था नागमठाण यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होणार असून प्रमुख उपस्थिती सहाय्यक पोलिस अधिक्षिका वैजापूर महक स्वामी,पो,नि,श्यामसुंदर कौठाळे, अभिनेत्री मुंबई उर्मिला डांगे,विरगाव पो,नि,शरदचंद्र रोडगे,गट विकास अधिकारी देव घुनावत,बाजीराव घोरपडे( दौंड),ऍड धनराज अंभोरे, व संतोष दौडे यांची राहणार आहे,
कार्यक्रम सूत्र संचलन माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत करणार आहेत,लाडगाव रोड ला असलेल्या सुभद्रा लॉन येथे हा कार्यक्रम रविवार(ता,२६)रोजी दुपारी १२-३० वाजता आहे ,तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास यावे असे आवाहन आयोजक सूर्यकांत मोटे पाटील यांनी केले आहे,
Users Today : 18