सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात आकाश ॲग्री सोल्युशन्स लि.सिल्लोड येथे दिनांक – २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड व सोयगाव येथील शेतकरी यांना आत्मा योजनेअंतर्गत *जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण* या बाबीखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यात प्रामुख्याने डाॅ.ओमप्रकाश कोहिरे माजी प्राचार्य कृषि महाविद्यालय जालना यांनी रब्बी पिकांचे नियोजन व व्यवस्थापन, डाॅ.राजीव पाटील मास्टर ट्रेनर सेंद्रिय शेती NSDC दिल्ली यांनी सेंद्रिय शेती, डाॅ.किसन घोरसड पाटील यांनी PMFME व AIF योजना, श्री.ज्ञानेश्वर बरधे ता.कृ.अ.सिल्लोड यांनी आत्मा योजना व कृषि विभागाच्या योजना, श्री.मदनकुमार शिसोदिया ता.कृ.अ.सोयगाव यांनी पोक्रा व महाडिबीटी योजना, श्री.आकाश गौर संस्थापक आकाश ॲग्री सोल्युशन्स, सिल्लोड यांनी कृषि विभाग व पणन विभागाच्या योजना याविषयी माहिती दिली.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महालिंग कुंभार बी.टी.एम, सिल्लोड यांनी व आभार प्रदर्शन अमोल महाजन बी.टी.एम.सोयगाव यांनी केले. आजच्या कार्यक्रमास दोन्ही तालुक्यातील कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक तसेच प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Users Today : 18