एन.ए. प्लॉटच्या निकाली कारवाईसाठी मालेगांव नगर पंचायतने मागितली दोन महिन्यांची मुदत !

Khozmaster
2 Min Read
3D rendering of cyberpunk AI. Circuit board. Technology background. Central Computer Processors CPU and GPU concept. Motherboard digital chip. Tech science background.
सैय्यद इमरान
मालेगाव प्रतिनिधी : मालेगाव नगरपंचायत मध्ये भूखंडाचे एन.ए.करण्यासाठी शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत सध्या या प्रलंबित प्रकरणां पैकी काही प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होऊन ती निकाली काढण्यात आली आहे असा आरोप मालेगाव शहर वाशिम कडून केला जात आहेत गरीब शेतकरी गणेश काटेकर या व्यक्तीने एन.ए.प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण होत गंभीर असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे याच महिन्यात केली होती त्यावर    जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे पत्र मालेगांव नगर पंचायतला दि.१६ नोव्हेंबरला दिले होते मात्र नगरपंचायतने वेळ मारुन नेण्यासाठी,व काम टाळण्यासाठी दोन महिन्यात योग्य कारवाई करू असे पत्र काटेकर यांना देऊन आपली तात्पुरती सुटका करून घेतली आहे असा आरोप गणेश काटेकर यांनी बोलताना केला आहे अर्जदार गणेश रामभाऊ काटेकर हे भुखंड एन.ए.करण्यासाठी सहा महिन्यांपासून नगर पंचायत मध्ये चकरा मारत आहेत यांच्या मागुन दाखल करण्यात आलेल्या भुखंडाचे एन.ए.केले गेले आहेत असा आरोप सुद्धा गणेश काटेकर यांनी केला आहे आतून खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असल्याने गोरगरीबांची भुखंड एन.ए.करण्याची प्रकरणे टाळली जात असून ती प्रलंबित आहेत माझा भुखंड एन.ए.नसल्यामुळे मला शासनाच्या विविध सवलती व योजना पासून वंचित राहावे लागत आहे असे ही काटेकर यांनी सांगितले आहे तसेच त्यांनी बोलताना असेही म्हणाले आहे की,माझ्या भुखंडाचे एन.ए.आठ दिवसांच्या आत न केल्यास,मी जिल्हाधिकारी  कार्यालया समोर लवकरच आमरण उपोषण करणार आहे आणि तरीही न्याय न  मिळाल्यास आत्मदहन करेल असेही अश्वासन बोलताना सांगितले आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *