कासव दाखवतो सांगत तीन मुलांना विहिरीत ढकलले, सिन्नरमध्ये भयंकर घडलं, कारण काय?

Khozmaster
2 Min Read

 सिन्नर: नाशकातील सिन्नर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील तीन लहान मुलांना विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगत तीन लहान मुलांना विहिरीत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे.

नात्यातीलच संशयिताने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. विहिरीत पडलेल्या तिन्ही मुलांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांचा जीव वाचला आहे. याप्रकरणी संशयित अमोल रामनाथ लांडगे याला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. वरद संतोष घुगे (वय १३), अथर्व संतोष घुगे (९) आणि त्यांचा मित्र आदित्य सानप (१३) अशी विहिरीत ढकललेल्या मुलांची नावं आहेत.वरद, अथर्व, आदित्य हे तिघे बुधवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अंगणात खेळत असताना अमोल लांडगे याने जवळ असलेल्या विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोघांकडून कासव घेऊन ये, असं वरद आणि अथर्व यांना सांगितले. त्यामुळे तिघेही विहिरीकडे गेले आणि तिथे उभ्या असलेल्या विक्रम माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके या दोघांनी कासव बघण्यासाठी मुले विहिरीत डोकावली असता तिघांनाही पाठीमागून धक्का देऊन विहिरीत ढकलून दिलं आणि तेथून पळ काढला.यावेळी विहिरीत पडल्यानंतर विहिरीतील विद्युतपंपाचा पाइप आणि तारेला बांधलेली दोरी वरदच्या हाती लागली. त्याने स्वतःचा जीव वाचवत इतर दोघांनाही विहिरीबाहेर काढले. त्यानंतर हे तिघेही घरी गेले. सुरुवातीला त्यांनी घरी कोणालाही काही सांगितलं नाही. पण, त्यांचे कपडे ओले झालेले पाहून घरच्यांना संशय आला. जेव्हा त्यांनी मुलांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी घडलेली घटना सांगितली.दीपाली संतोष घुगे (३२, रा. वडगाव-पिंगळा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून अमोल लांगडे यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपींचा नेमका हेतू काय होता, याचा तपास करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *