तलाठी उपलब्ध राहत नसल्याने ग्रामस्थ हैराण मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला ठेंगा..

Khozmaster
3 Min Read
संग्रामपूर, : तलाठी
हे क्षेत्रीय स्तरावरील सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद आहे. मात्र, तलाठी यांनी मुख्यालयी राहण्याचे शासनाचे आदेश असून सुद्धा तलाठी मुख्यालयी राहत नाही. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या शेतकऱ्यांशी निगडीत , अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, सातबारा, फेरफार, आठ अ अशा प्रकारचे कागदपत्रे शेतकरी यांना केव्हाही लागतात. परंतू, तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत जनतेकडून वारंवार तक्रारी करण्यात येतात. यावर मात्र, कुठलाही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नाही व कारवाई करत नाही.
महसुल विमाग
तलाठी कार्यालय वानखेड – ता. संग्रामपुर जिल्हा बुलढाणा
 बंद असलेले वानखेड येथील तलाठी कार्यालय.
येथे वेळेवर तलाठी हजर मिळत नसल्याने परिणामी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. तलाठी आपली हजेरी बुक प्रमाणे हजर तर असतात परंतु कार्यालय कधीही उघडे दिसत नाही आठवड्यातून एखाद्या दिवशीच कार्यालय उघडते मग त्यांचा कारभार हा फर्जी व दलाला मार्फत चालतो यामुळे शेतकऱ्यांची तसेच गावातील नागरिकांची गैरसोय होत असून तलाठी कार्यालयातून लागणारे आवश्यक कागदपत्र नागरिकांना वेळेत मिळत नाहीत आणि आठवड्यातून एक दोन चक्कर तलाठी कार्यालयात तलाठी मारतात परंतु एखाद्या व्हीआयपी सारखे येऊन लगेच परत जातात फक्त आठवडाभर झालेली वसुली त्यांच्या दलालांकडून घेण्याकरताचं येतात की काय असा संभ्रम नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे आणि गावातील नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी यांना फोन केल्यास उडवाउडवीचे उत्तरे मिळतात आणि तहसीलदार टोम्पे हे तर त्यांच्याच कर्मचाऱ्यांचा झाक झाकतात मग वेळ येते ती नागरिकांवर आपलं घराणं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सांगण्याची अशा वेळेस मग नाक वरिष्ठ अधिकाऱ्यांना साधारण तलाठी कार्यालयाच्या बाबतीत चक्क एसडीएम किंवा जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो तेथून नागरिकांना प्रतिसाद मिळतो परंतु तालुक्याच्या ठिकाणी असलेले तहसीलदार मात्र त्यांच्या वेगळ्याच धावपळीत दिसतात अशी असताना सर्व अवैध धंदे चालतात तरी कसे मग शासनाकडून पगार घ्यायचा नागरिकांच्या कामाचा आणि सुरक्षा पूर्वी ती अवैध्य व्यवसायाला नागरिकांच्या कामाचे काय.
तहसीलदार यांनी तलाठ्यांना साप्ताहिक कामाची दैनंदिनी द्यावी. प्रत्येक तलाठ्यांनी कामाच्या वेळा ठरवून तसे फलक तलाठी यांनी लावावे. तसेच नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता वरिष्ठांनी अनपेक्षित भेट देऊन पाहणी करावी. परंतू तहसीलदार टोम्पे हे नागरिकांच्या समस्येचे निराकरण न करता फक्त आपण नाही त्यांच्याच कामात व्यस्त असतो असा आव आणून वरिष्ठांची दिशाभूल तर करत नाहीत ना.? म्हणजे यांचेच तर संगणमत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्यात कुठल्याही तलाठी कारल्याबद्दल किंवा अवैध्यरिती वाहतुकीबद्दल तहसीलदार यांना माहिती दिली तर त्यांच्याकडून नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण होत नाही दुसरीकडे एचडीएम काळेसाहेब किंवा डायरेक्ट माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोनवर माहिती नागऱ्याकडून मिळतात क्षणाचाही विलंब न करता त्यांच्याकडून तक्रार करणाऱ्या नागरिकांचे समाधान केले जाते मग तहसीलदार साहेबांच्या वागणुकीवरून *”चहा पेक्षा कॅटली गरम”* असे वाटत आहे.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *