पातूर प्रतिनिधी ;-
तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत पातूर–झवाडेगाव मार्गावरील हिंगणा नजीकच्या निगुर्णा नदी पुलाजवळ १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात वाहनाने नीलगायीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली. अचानक झालेल्या धडकेत नीलगायीच्या कंबरेपासून गंभीर दुखापत झाली.
हिंगणा येथील युवक गोपाल सोनोने व उजाडे यांनी जखमी अवस्थेत नीलगाय दिसताच तत्काळ आलेगाव वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.
वनविभागाची तातडीने मदत
घटना समजताच वनपाल एम. एस. सय्यद, अजय मेसरे, स्वप्नील तेलगोटे आणि वाहनचालक प्रशांत डोमळे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून जखमी नीलगायीला तातडेने उपचारासाठी आलेगाव येथे नेले.
उपचारानंतर सुरक्षित सोडण्यात आले
प्राथमिक उपचारानंतर नीलगायीला जंगलातील सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले असून ती पूर्णपणे बरी होईपर्यंत तिच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनपाल सय्यद यांनी दिली
Users Today : 18