मतदार नोंदणीसाठी आता दहा दिवसच मुदत; १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी

Khozmaster
2 Min Read

Solapur News : लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.

राज्यात आता एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी १ जानेवारी २०२४ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील साडेतीन मतदान केंद्रांवर जाऊनही मतदार नोंदणी केली आहे.

विशेष बाब म्हणजे १ जुलै ते २९ नोव्हेंबर २०२३ या काळात सोलापूर जिल्ह्यात २५ हजार नवमतदार वाढले आहेत. ते सर्वजण १८ ते १९ वयोगटातील आहेत. आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे.

तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल. त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून किंवा ऑनलाइन केंद्रांवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याच्या निवडणूक शाखेने केले आहे.

नवमतदार नोंदणी किंवा दुरुस्ती कशी करायची?

नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून घ्यावे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो.

मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.‌ तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरीललोकसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०२४ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. मतदार नोंदणीसाठी ९ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ज्या तरुण-तरुणींचे येणाऱ्या १ जानेवारीपर्यंत १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांनाही मतदार नोंदणी करता येईल.

0 6 2 5 6 2
Users Today : 198
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *