ओतूर, ता. १ : कोळवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. वाघोलीतील विष्णू शेकोजी सातव विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी नसरीन सय्यद व हमिदा मुलाणी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला.याप्रसंगी ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वेटर्स वाटप करण्यात आले. यानिमित्ताने कांडगे यांनी मुलांशी संवाद साधला. ‘‘विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता व शालेय अभ्यासाला प्राधान्य द्यावे. पाढे पाठांतर करावे. त्याचप्रमाणे आपल्या आई-वडिलांची आणि शिक्षकांची आज्ञा पाळावी. चांगल्या गोष्टीचा अंगीकार करावा. मोबाईलचा जास्त वापर न करता मैदानी खेळ खेळावेत, असे कांगडे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक बापू कुमकर उपस्थित होते. या वेळी पांगरीतर्फे मढ (कोळवाडी )येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नव्यानेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य शंकर कुमकर, छाया लोखंडे, ज्ञानेश्वर मेंगाळ सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश कुमकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम कुमकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कांतिलाल कुमकर, सुनंदा कुमकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कैलास कुमकर, पोलिस पाटील जगन कुमकर, मारुती कुमकर, विशाल सस्ते, सागर कुमकर, सचिन कुमकर, महेश लोखंडे, सचिन कुमकर, भारती भालेकर, सुषमा केदार, सोनाली केदार, रामचंद्र कुमकर, शीला उकिर्डे, सखूबाई कुमकर, मनीषा ताजणे, सोनाली कुमकर, विद्या कुमकर, जितेंद्र लोखंडे, दशरथ कुमकर, मंदा कुमकर, जालंधर कुमकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय डुंबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष पाडेकर यांनी केले. तसेच, मेघा डुंबरे यांनी आभार मानले.
Users Today : 11