प्रवासी महासंघाची मागणी मान्य शिवमहापुराण कथेसाठी जादा बसेस रवाना.

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) धुळे येथे विश्व विख्यात भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांचे सुश्राव्य शिवमहापुराण  सुरू आहे.  नंदुरबार आगारातर्फे धुळे येथे भाविकांना जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्याची मागणी ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी प्रणित महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि पदाधिकाऱ्यांनी एका  निवेदनाद्वारे केली.  धुळे विभाग नियंत्रक आणि नंदुरबार आगारप्रमुखांनीी सकारात्मक प्रतिसाद देऊनमागणी मान्य करीत धुळ्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.
 महाराष्ट्र  प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार तालुकातर्फे धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते आणि नंदुरबार आगारप्रमुख संदीप निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मध्यप्रदेश राज्यातील सिहोर येथील भागवत भूषण विश्वविख्यात कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या  मधुरवाणीद्वारे शिवमहापुराण कथेचे धुळे नगरीत आयोजन करण्यात आले आहे.
   दि.  19 नोव्हेंबर पर्यंत  दररोज सकाळी धुळे येथे जाण्यासाठी आणि कथा संपल्यानंतर परतीच्या मार्गासाठी धुळ्याहून नंदुरबारसाठी ज्यादा बसेस सोडण्यात याव्या.
    नंदुरबार आगारातून सकाळी सहा वाजे पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत नंदुरबार- धुळे वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे. कथा श्रवणानंतर अनेक भाविकांना नंदुरबारच्या परतीसाठी राज्य परिवहन महामंडळाने सुविधा करून द्यावी. याचबरोबर सुस्थितीतील एसटी बसेस देण्याची काळजी घ्यावी.शक्य झाल्यास नंदुरबार बसस्थानकावरून थेट धुळे येथील हिरे मेडिकल जिल्हा रुग्णालय शेजारील कथा मंडपापर्यंत भाविकांसाठी एसटी बसेस  उपलब्ध करून द्यावी. अशीही मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुकातर्फे करण्यात आली आहे.
   या निवेदनावर प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे, उपाध्यक्ष  डॉ.गणेश ढोले, संघटक योगेश्वर जळगावकर, ज्येष्ठ सदस्य बी. डी. गोसावी,  वैभव  करवंदकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदन स्वीकारल्यानंतर आगार प्रमुख संदीप निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळी हंगाम असला तरी धुळे येथील शिवमहापुराण कथेसाठी प्रवासी भाविकांची संख्या लक्षात घेता जादा बसेस सोडण्याची मागणी मान्य केल्याने नंदुरबार येथील असंख्य भाविकांनी समाधान व्यक्त करीत प्रवासी महासंघाचे आभार मानले आहेत.
फोटो कॅप्शन – धुळे येथील शिव महापुराण कथेसाठी नंदुरबार येथून जादा बसेस सोडण्याबाबतचे निवेदन आगार प्रमुख संदीप निकम यांना देताना प्रवासी महासंघाचे जेष्ठ सदस्य बी.डी. गोसावी, सोबत अध्यक्ष महादू हिरणवाळे,डॉ. गणेश ढोले, योगेश्वर जळगावकर, वैभव करवंदकर आदी.
0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *