राहुल चौरे
पाटोदा प्रतिनिधी.पाटोदा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी अवकाळी पाऊसामुळे कापूस,तुर आणि कांदा इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीच ऑनलाईन तक्रार तात्काळ कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना पाटोदा तालुका प्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे.सध्या अवकाळी पावसामुळे कापूस,तूर व खरीप कांदा पिकाचे नुकसान झालेले आहे. प्रशासन माध्यम व सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करीत आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केल्या आहेत.काही शेतकऱ्यांना गांभीर्य नाही यामुळे तक्रार केली तरच पीकविमा नुकसान भरपाई मिळेल. यामुळे उद्याच्या दिवस वेळ आहे खरिपाची crop insurance या ॲपव्दारे unseasonal rain या द्वारे ऑनलाईन तक्रार केली तरचं आपल्याला भविष्यात मदत मिळणार आहे,तरी आपल्या गावातील शेतकरी,मित्र,शेती असलेले पाहुणे, यांना या बाबत तात्काळ कळवावे, त्यांना एकरी हजारोंची मदत मिळू शकते यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पीकांचा देखील पिक विमा भरून घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख राहुल चौरे यांनी केले आहे