बीडमध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, पुण्यातील ‘या’ ठिकाणी वापरण्यात येणार होत्या नोटा, पोलिसांनी सापळा रचला अन्…

Khozmaster
3 Min Read

बीड : बीडमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यात बीड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शहरात चौदा ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी आरोपी प्रिंटरच्या साहाय्याने नोटा छापत होते. त्यासाठी लागणारा कागद हा बाहेर राज्यातून आणला जात होता. या प्रकरणात खूप मोठे धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

यात संशयीत आरोपी सनी आठवले, महेश आठवले आणि मनीष क्षीरसागर यांच्या घरी झाडाझडती घेतली असता चाकू, कुकरीसह घातक शस्त्र आढळून आली. बनावट नोटा प्रकरणाचे धागेदोरे हे इतर राज्यात देखील असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी दिली.

बीडमधील बनावट नोटांचं पुणे कनेक्शन काय?

बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला मनीष क्षीरसागर याचा साथीदार प्रवीण गायकवाड हा फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. बीड शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक यांनी गायकवाड याला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. ५००, २०० आणि १०० रुपयांच्या साडेआठ हजार रुपये अशा बनावट नोटांसह एक पिस्टल आणि इतर साहित्य पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलं आहे.पुणे येथील एका कॉलेजमध्ये प्रवीण गायकवाड हा जॉबला असून तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणणार होता. मात्र या आधीच पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावला. आतापर्यंत बनावट नोटा प्रकरणात पाच आरोपींची नावे समोर आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून यातील मुख्य सूत्रधार मनीष क्षीरसागर हा गुन्हा दाखल झाल्यापासून बनावट नोटांच्या साहित्यासह फरार आहे. बीड मधील बनावट नोटांचे धागेदोरे हे पुण्यापर्यंत जाऊन पोहोचले असून अजून किती ठिकाणी पोहोचले असावे या दिशेने पोलीस तपास करत आहेत.प्रवीण गायकवाडला मनीष क्षीरसागरने बनावट नोटांचे नमुने आणि एक पिस्टल सुद्धा पाठवलं होतं आणि दोन लाखात चार लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. तसंच बनावट पैसे हे सिंहगड कॉलेजला वापरण्यात येणार होते. आरोपी प्रवीण गायकवाड हा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी जी रक्कम द्यावी लागते त्या रकमेत बनावट नोटा घुसवणार होता.

बीडमधील नोटा पुण्यात चलनात आणण्यात येणार होत्या

बीडमध्ये किराणा दुकान, पेट्रोल पंप यासह अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात दिल्यानंतर, नोटा चालू लागल्याची पक्की खात्री आरोपींना झाल्यानंतर त्यांना पुण्यात बनावट नोटा चलनात आणायच्या होत्या. मात्र या आधीच पोलिसांनी प्रवीण गायकवाड याला ताब्यात घेतलं आणि बीड शहर पोलिसांनी छापा टाकून त्याचा हा डाव उधळून लावला.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *