महाविद्यालय तरुणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला भयंकर प्रकार

Khozmaster
2 Min Read

नीटची तयारी करीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने मोबाइलवर पीडितेचे नग्न फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर १० ते १२ वेळा बलात्कार केल्याची समोर आले.

या बाबतची माहिती अशी की, सुमारे नऊ महिन्या पूर्वी जानेवारी २०२४ मध्ये वैद्यकीय पात्रता परीक्षेची तयारी करीत असलेली १९ वर्षाची तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली होती. तेव्हा तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सुरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. त्याने तिला लातूरला जात आहे असे सांगत कारमध्ये बसवले.केजपासून पुढे ७० किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवली आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने हॉटेलच्या एका रूममध्ये नेले. आरोपीने तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला, तसेच मोबाइलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या घटनेनंतर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलीहा प्रकार झाल्यानंतर सुरजने तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेवून सोडले. त्यानंतर वारंवार फोन करून फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई वडीलासह नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. सुरजने ब्लॅकमेल करून पीडित तरुणीवर १० ते १२ वेळा लैंगिक अत्याचार केला. एके दिवशी सुरज गुंड याने सर्व व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर पाठवून दिले. याबद्दल तरुणीला जाब विचारल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला.पीडित तरुणीने ११ सप्टेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना या सर्व प्रकारची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली. दरम्यान हा प्रकार गंभीर असल्याने आरोपी फरार होवू नये याची दक्षता घेत केज पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे सूरज गुंड याच्यावर पाळत ठेवून गुन्हा दाखल होताच त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *