आपला लढा अंतिम टप्प्यात, सरकारसमोर पर्याय नाही, जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Khozmaster
2 Min Read

बीडमधील परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठक पार पडली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील हल्लाबोल केला आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात रविवारी (8 सप्टेंबर) बीडमधील परळी वैजनाथ येथे घोंगडी बैठक पार पडली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधला आहे.जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही. देवेंद्र फडणवीसांनी सापळा रचला आहे.चार दिवसाला नवीन बैल येतो. मी फडणवीसांना एकच सांगतो मराठ्यांचा नाद सोडून द्या,नाहीतर राज्यात भाजपा राहायचं नाही”. असं जरांगे म्हणाले आहेत.जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही. देवेंद्र फडणवीसांनी सापळा रचला आहे.चार दिवसाला नवीन बैल येतो. मी फडणवीसांना एकच सांगतो मराठ्यांचा नाद सोडून द्या,नाहीतर राज्यात भाजपा राहायचं नाही”. असं जरांगे म्हणाले आहेत.जरांगे पाटील यांनी लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ”तुम्ही तात्पुरत्या योजना कशा करता आणता? त्याऐवजी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांना 24 तास लाईट द्या, जे पाहिजे ते सरकार देत नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याऐवजी आयुष्यभराच्या सुविधा द्या.”

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *