चिखली : केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि राज्याची नमो किसान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनेक त्रुटी असल्याने पात्र असूनही हजारो शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्या बँक , आधार किंवा अन्य ज्या त्रुटी असतील त्या दुर करुन वंचित शेतकऱ्यांना तातडीने PM व नमो किसान योजनेचा लाभ देण्याची मागणी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रका व्दारे केली आहे.
दि १ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिध्दीस दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यात PM KISAN एकुण 3,46,574 शेतकऱ्यांची नोंदणी PM kisan Portal वर झालेली आहे . त्यापैकी 3.34,613 (97%) शेतकऱ्यांची ई-केवायसी तर 3,28,792 (96%) शेतकऱ्यांची आधार सिडींग पूर्ण झालेले आहे . पैकी 6773 पात्र शेतकऱ्यांचे land seeding तर 13914 शेतकऱ्यांना (self Register) पात्र/अपात्र करणे बाकी आहे . यामुळे हजारो शेतकऱ्यांना पात्र असूनही या योजनेचा लाभ मिळत नाही.
पुर्ण वेळ डाटा ऑपरेटर ऊपलब्ध करुन द्या
योजना राबवितांना तालुकास्तरावर PM KISAN चे काम करण्यासाठी पूर्ण वेळ डाटा ऑपरेटर नसल्याने डाटा एन्ट्री चे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पुर्ण वेळ डाटा ऑपरेटर ऊपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.
ग्राम सेवक व तलाठी यांनी कुटुंब निश्चितीचे काम तातडीने करावे
PM व नमो किसान योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाची निश्चिती करण्याचे काम ग्रामस्तरीय समितीचे आहे. त्यामध्ये तलाठी व ग्रामसेवक हे समिती सदस्य असून पात्र शेतकरी कुटुंब निश्चितीचे काम अतिशय उदासितेने सुरू असल्याने देखील पात्र शेतकरी या योजने पासून वंचित राहत आहे. त्यामुळे ग्राम स्तरीय सदस्य तलाठी आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या कडील कुटुंब निश्चितीचे काम तातडीने पुर्ण करावे तसेच या योजनेतील या व्यतिरिक्त असलेल्या त्रुटी दुर करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचे हक्काचे पैसे जमा करण्याचे देखील आवाहन आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या अंती केले आहे.
Users Today : 32