भोर, ता. २ : शहरातील आर्यन्स मार्शल आर्ट्स असोसिएशन कराटे इंडियाच्या वतीने तालुक्यातील १० विद्यार्थिनींसह १६ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. भोर येथील गंगोत्री हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कराटे सिहान शिवाजी ढवळे, विजय शेलार आणि भोरच्या पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरुंगे यांच्या हस्ते १६ विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्टसोबत कराटे इंडिया ऑर्गनायझेशन फेडरेशनचे प्रमाणपत्र, चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आर्यन्स मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या वतीने पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण बरोबरच शारिरिक तंदुरुस्ती, काता, किहान, कुमिते, रोड फाइट, मर्दानी खेळ, लाठीकाठी, नानाच्याक, स्टीक, सामुराई इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले. याबरोबरच योगा, मेडिटेशन, स्नेक इव्हेंट, स्वीमिंग, क्लाइंबिंग, रोलिंग, सायकलिंग, आर्चरी, खगोल शास्त्रीय माहिती, नाईट ट्रेक आणि फायर कॅम्प या प्रकारच्या प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.
या असोसिएशनच्या वतीने आजपर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थी ब्लॅक बेल्ट धारक झाले आहेत. या वेळी कराटे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सिहान सोमनाथ ढवळे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके, भोर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंडूशेठ गुजराथी, प्रा. ज्ञानेश्वर खोपडे, पोलिस हवालदार दत्तात्रेय खेंगरे, विकास लगस आदी उपस्थित होते.
ब्लॅक बेल्ट मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – रियांश गुजर, अभ्युदय कंक, सान्वी कोंढाळकर, ऋचिता कोंढाळकर, चैतन्या जाधव, मनस्वी जाधव, यश आवळे, श्रावणी म्हस्के, कावेरी खोपडे, संस्कृती जाधव, मीत गुजराती, श्रुती धोंडे, सिद्धी दामगुडे, सर्वेश खोपडे, प्रज्ञेश कंक, खुशी ढवळे.
भोरमधील १६ विद्यार्थ्यांनी पटकाविले ब्लॅक बेल्ट
0
9
3
7
7
1
Users Today : 9
Leave a comment