येनीकोनी’ची धुरा पुन्हा फुके दाम्पत्याकडेच

Khozmaster
2 Min Read

नरखेड तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या येनीकोनी ग्रामपंचायतीची धुरा पुन्हा एकदा सरपंच उषा फुके व उपसरपंच मनीष फुके यांच्याकडेच राहील. फुके दांपत्यावर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई नागपूर विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी रद्द ठरविली आहे.सरपंच उषा फुके यांनी त्यांचे पती मनीष फुके यांना ग्रामपंचायतीच्या आदेशावरून केलेल्या कामात प्रत्यक्ष हितसंबंध जोपासत लाभ दिल्याचा ठपका ठेवत अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी लोकप्रतिनिधी असलेल्या फुके दाम्पत्याला अपात्र ठरविले होते. या निर्णयाला आव्हान देत सरपंच व उपसरपंच असलेल्या फुके दाम्पत्याने अपर विभागीय आयुक्त माधवी खोडे (चवरे) यांच्याकडे अपील दाखल केले होते. यावर २० नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली होती. यात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत अपर जिल्हाधिकारी यांचा निर्णय रद्द करून अपिलकर्ता सरपंच उषा फुके व मनीष फुके यांचे अर्ज मान्य करण्याचा आदेश देण्यात आला. सरपंच उषा फुके आणि उपसरपंच मनीष फुके यांच्यावरील अपात्रतेची कारवाई रद्द झाल्यानंतर येनीकोणी येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे दमदार स्वागत करण्यात आले.

नेमके काय आहे प्रकरण ?

येनीकोणी येथील प्रवीण वासाडे व राजकुमार घाडगे यांनी सरपंच उषा फुके तसेच प्रफुल्ल पंचभाई व वासुदेव गावंडे यांनी उपसरपंच मनीष फुके यांच्या विरोधात पंचायतीच्या आदेशावरून केलेल्या कामात त्यांचे हितसंबंध असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ (१] (ग) अन्वये सरपंच यांनी हितसंबंध जोपासत पती उपसरपंच यांना लाभ मिळवून दिल्याचा आरोप करीत त्यांचे ग्रा. पं.चे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी याचिका नागपूर येथील अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्याकडे दाखल केली होती.

0 9 3 7 7 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *