राजीनामा दिला तर तो मागं घेण्याची माझ्या स्वत:मध्ये कुवत, शरद पवारांनी अजित पवारांचा तो दावा खोडून काढला

Khozmaster
2 Min Read

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थक आमदार आणि खासदारांची बैठक पुण्यात घेतली. यावेळी राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आणि शेतकऱ्यांना मदत, लोकसभा निवडणूक तयारी यासंदर्भात चर्चा झाली. अजित पवारांनी काल केलेल्या गोप्यस्फोटांबद्दल शरद पवार म्हणाले की त्यातील काही गोष्टी मला पहिल्यांदा समजल्या. त्यात बॉम्ब होता का? स्फोट होता का? याचा अभ्यास करावा लागेल.

मी कुणाला देखील बोलावलं नव्हतं. मी पक्षाचा अध्यक्ष असल्यानं अनेकांशी सुंसवाद ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. काही सहकारी ज्या रस्त्यानं जाण्याचा विचार करत होते, तो मुद्दा आम्हाला किंवा जनमानसात आम्ही जे शब्द दिले होते त्यांच्याशी सुसंगत नव्हता. भाजप आणि तत्सम प्रवृत्ती विरोधात आमची भूमिका होती. आमचे लोक जे निर्वाचित झाले त्यांना भाजप विरोधी मतं मिळाली होती. जाहीरनामा मांडला होत्या त्यापेक्षा विपरित काम करावं, असं लोकांना मान्य होणार नव्हती, असं शरद पवार म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेच्या बाबत आमची वेगळी भूमिका आहे. आम्ही जेवढे भाजप विरोधात आहे तेवढा विरोध शिवसेनेला नव्हता. भाजपला आम्ही पाठिंबा दिला होता हे सांगतात ते मंत्रिपदाची शपथ घेऊन सांगतात, असं शरद पवार म्हणाले.मी राजीनामा देतो म्हणायचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो, सामूहिक निर्णय झालेला होता. आमची भूमिका होती, भाजपसोबत जायला नको, असं शरद पवार म्हणाले. अनिल देशमुख यांनी देखील काल स्पष्ट केलं की त्यांनी या मार्गानं आपल्याला जायचं नव्हतं अशी भूमिका मांडली होती.मी राजीनामा दिल्यानंतर तो मागं घेण्यासाठी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाड यांना सांगायची गरज नव्हती. मला स्वत:ला माझा निर्णय घेण्याची कुवत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आमच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा झाल्या पण राजीनामा देतो, अशी चर्चा झाली नव्हती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.संसदीय लोकशाही पद्धतीत कोणत्याही मतदारसंघात कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन मतदारांपर्यंत जाऊ शकतो. जर त्यांनी निवडणूक लढवली तर त्याची तक्रार करण्याची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले.

0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *