प्रतिनिधी बार्शीटाकली.
शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे व महान केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ शाहिद इक्बाल खान यांच्या मार्गदर्शना खाली नवभारत साक्षरता अभियान केंद्र स्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन समूह साधन केंद्र महान येथे करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद शाळा कासमोर चे मुख्याध्यापक गजानन रामदास गोतरकर व जिल्हा परिषद शाळा वाघावस्तापुर चे मुख्याध्यापक शिवशंकर आस्वर हे होते यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले केंद्र शासनाच्या वतीने नवभारत साक्षरता अभियान राबविल्या जात असून त्या अंतर्गत पंधरा ते पस्तीस वयोगटातील तसेच पस्तीस पेक्षा जास्त वयोगटातील निरक्षर नागरिकांना शिक्षित करण्या साठी अभियान राबविल्या जात आहे या पूर्वी शिक्षकांनी सर्वेक्षण करून आपल्या क्षेत्रातील वयोगटा नुसार निरक्षरांची संख्या निश्चित केली आहे त्या अनुषंगाने स्वयंसेवक व शिक्षकांनी निरक्षर नागरिकांना कशाप्रकारे शिक्षण देण्यात यावी तसेच त्याची नोंदणी ऑनलाइन कशी करावी याबाबत उपस्थित कार्यशाळांमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रशिक्षकांनी उल्हास ऐप व त्या मध्ये माहिती कश्या प्रकारे भरावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले या वेळी राजेश महादेव आंबुलकर मोहम्मद सज्जाद शेख इस्माईल अब्दुल खालिक शेख हसन प्रकाश काशीराम राठोड दत्तकुमार चव्हाण तेजराव बिललेवार शंकर पिलात्रे राम रतन मेंढे गमरसिंग वसावे निलेश पांडे वासीमोद्दीन हकिमोद्दीन जहागीरदार मुजीब बेग मोहम्मद बेग गौतम इंगळे मदन श्रीराम पानझाडे विशाल शंकरराव म्हस्के अदी प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश अंबुलकर यांनी तर आभार प्रदर्शन राम रतन मेंढे यांनी केले