माविम अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त केकतउमरा येथे जनजागृती रॅली व रांगोळी स्पर्धा संपन्न “पार्क प्रकल्प व लोकसंचालित साधन केंद्र यांचा पुढाकार”

Khozmaster
3 Min Read
जिल्हा प्रतिनीधी / 
वाशिम ; दिनांक 3 डिसेंबर रोजी,  महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र अनसिंग  कळंबा महल्ली  केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पोस्टर जनजागृती रॅली आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह येथे करण्यात आले होते. या मधी  केकतउमरा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र वरीष्ठ  शाळेतील  विद्यार्थीयांच्या समावेश होता. गावामधून प्रभात फेरी काढून पोस्ट जनजागृती रॅली काढून दिव्यांग दिना जागृती  घोसाना देण्यात आला.या रॅलीचे प्रतिनिधीत्व माविम व्यवस्थापक संगिता शेळके, मुख्याध्यापक प्रा.राम वाणी,शिक्षक  सुरेश गोटे,अरुण इंगोले, दिलीप शिंदे वंदना इंगोले, विष्णुदास शिंदे,गणेश गोटे,संजय साबळे, सुभाष काकडे ,शिवाजी पोटे यांनी सहकार्य केले,नंतर शालेय विद्यार्थ्यांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर कार्यक्रमांचे अध्यक्ष ग्राम पंचायत केकतउमरा सचिव राजेश शेकळे, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते तथा माविम मित्र मंडळ अध्यक्ष प्रदिप पट्टेबजदुर, माविन व्यवस्थापक – संगीता शेळके, संतोष शेळके, प्रमोद गोरे, लेखापाल प्रदिप देवकर, लेखापाल सिमा पाचपिल्ले, सल्लागार सागर विभुते,अरुण सुर्वे, यांची प्रमुख उपस्थिती होती. उपास्थित सर्वांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर यांनी दिव्यांग नागरिक व उपस्थीत गावकरी महिला बचत गट समुह यांना मार्गदर्शन केळे.  या मधे दीव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचा योजना नविन नोंदणी  संदर्भात सविस्तर माहिती दिली.
या मधी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेमधी विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामधे प्रथम क्रमांक सायली पडघान , द्वितीय यशस्वी पट्टेबहादुर ,तृतीय श्रेया वालुळकर , यांनी पटकाविले यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गेल्या ४ वर्षा पासून  माविम मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्य करनारे बचत गट समुह  महिलांना व ग्रामीण भागांतील युवक युवती दिव्यांग व्यक्तींना प्रतेक्ष मदत आणि मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे श्री. प्रदिप  कडुजी पट्टेबहादुर यांना दिला जाणारा महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुधारक सन्मान पुरस्कार 2023 चा देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिव्यांग व्यक्ती यांचा देखील सन्मान करण्यात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप देवकर यानी केळे, तर प्रास्ताविक संगिता शेळके मॅडम यांनी केले सर्वांचे आभार शारदा टेलगोटे यांनी मनीले या कार्यक्रमाला साठी सहोगिनी  सुनिता मनवर,आशा इंगळे, पूनम पट्टेबहादुर,शारदा तेलगोटे,वनिता तायडे,सुरेखा कदम, यांनी परिसर घेतले यावेळी गावातील माविम  महिला बचत समूहाच्या अध्यक्षा सदस्या व महिला गावातील नागरिक विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *