मळसूर : पातूर पंचायत समिती येत असलेल्या ग्राम मळसूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे उच्च दिले आहे. श्रेणी मुख्याध्यापक पद गेल्या कित्येक दिवसापासून रिक्त असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना व बाहेरगावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना विविध कामासाठी शाळेची टीसी, प्रवेश निर्गम उतारा इत्यादी दाखले मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. काही नागरिकांना विविध सरकारी कामासाठी योजनेसाठी शाळेची टीसी, निर्गम उताऱ्याची पूर्तता होत नसल्याने योजनेपासून वंचित राहिले आहे. शिक्षक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
प्रतिक्रिया
1) येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक धनोकार यांच्याकडे आहे. त्यांना मी पत्र अंतर्गत
– दीपमाला भटकर, गटशिक्षणाधिकारी, पातूर.
प्रतिक्रिया
2) गेल्या आठ दिवसांपासून शाळेत टीसीसाठी चकरा मारत असून, टीसी मिळत नाही. शासनाच्या योजनेसाठी टीसीची अत्यंत आवश्यकता आहे. सरकारी योजनेपासून वंचित राहत आहे.
– वसुदेव लहूकार, ग्रामस्थ मळसूर.
प्रतिक्रिया
3) माझी सर्जरी झाली आहे. मी दिव्यांग असून, तसे शिक्षण विभागाला पत्र दिले आहे.
– एम. एस. धनोकार, शिक्षक