चिखली : समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आपले ज्ञानपंख वृत्त पत्र आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळाचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे संपन्न झाले होते. यामध्ये चिखली येथील पत्रकार योगेश शर्मा यांना राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट पत्रकार ज्ञानपंख गौरव पुरस्कार, संतोष काळे पाटील यांना राज्यस्तरीय युवा उदयोजक सन्मान गौरव पुरस्कार, प्रशांत डोंगरदिवे यांना अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार तर सारंग महाजन यांना सामाजिक कार्यकर्ते ज्ञानपंख गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
सविस्तर असे कि पत्रकारिता च्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय देत अन्यायला वाचा फोडत विविध वृत्तपत्र व टेलिव्हीजन सोबत जणसामान्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत सर्वांना आपलंस करीत शून्यातून विश्व् निर्माण करणारे चिखली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट गौरव पुरस्कार देण्यात आला. तर मौजे भोकर येथील प्रतिष्ठित आई वडिलांच्या पुण्याई ने व स्वतः च्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर अत्यल्प कालावधीत स्वयंम उद्योगाच्या माध्यमातून आजच्या नवं युवकां समोर एक नवा आदर्श निर्माण करीत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून स्वतः च्या पायावर उभे केले असे कष्टाळू व प्रगतशील युवा उद्योजक संतोष काळे पाटील यांच्या कार्याची दाखल घेत यशस्वी युवा उद्योजक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बहुजन चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आज तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या माध्यमातून बेघर निराधार बेवारस वयोवृद्ध आजी आजोबा ची निःस्वार्थ निरंतर सेवा प्रशांत डोंगरदिवे करीत आहे त्यांना अनाथाचा आधार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सारंग महाजन यांनी गर्वी फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करत आहे तसेच मेडिकल कॅम्प मेडिकल चेकअप वृक्षारोपण करणे अत्यंत कमी दरात कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध करून दिले अशा सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सारंग महाजन ज्ञानपंख गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पत्रकार योगेश शर्मा, संतोष काळे पाटील, प्रशांत डोंगरदिवे व सांरंग महाजन यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होता असून सर्वत्र कौतुक होत आहे