प्रविण चव्हाण
नंदुरबार -: 23 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत वालंबा ता. अक्कलकुवा येथील दौलत जलसिंग पाडवी यांचा विज पडून नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत करण्यात आली असून चार लक्ष रुपयाचा धनादेश धडगाव मतदारसंघाचे आमदार अक्कलकुवा अॅड.के सी पाडवीयांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिराताई रवींद्र पाडवी, पंचायत समिती उपसभापती सौ.मेलदीबाई अमृत तडवी, रवींद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के पाडवी, राजमल तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आ.अॅड.के सी पाडवी यांनी या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत शासकीय मदतीचा धनादेश या कुटुंबाच्या स्वाधीन केला आहे नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या पाठीशी मतदारसंघाचा आमदार म्हणून आपली जबाबदारी असल्याचे सांगत या कुटुंबाला शासकीय योजनांचा अजून लाभ मिळवून देण्याचा शब्द या वेळेस दिला.
Users Today : 22