बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी गारपीट पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दि.1 डिसेंबर 2023 रोजी दिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचानक अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले तरी अधिकारी लवकर पंचनामे शेतकऱ्यांचे करत नाही काही भागात पंचनामे केली पण काही भागांमध्ये केलेच नाही शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे अधिकारी यांना आदेश देऊन लवकरात लवकर करण्यात यावे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव सुद्धा मिळत नाही राज्य सरकार हे सुद्धा शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे मुख्यमंत्री यांनी आदेश देउन शेतकऱ्यांचे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि शेतकरी यांच्यावर दरवर्षी काही ना काही नैसर्गिक संकटाने अडचणीत असतो त्याला न्याय राज्य सरकारने तात्काळ देण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने अगळे वेगळे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदनामध्ये दिला आहे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा महासचिव सलीमभाई, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, गोलू श्रीसागर हे होते.